Dr. Rakshit Madan Bagde deposited भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल- एक अध्ययन (2014 ते 2020) in the group
Open Access Books Network on Humanities Commons 3 months, 3 weeks ago
जीडीपीमधील उद्योगातील वाटा स्थिर असला तरी त्यात लक्षणीय मूलभूत परिवर्तन झाले. या कालावधीत उत्पादन पुनर्गठनाची प्रक्रिया म्हणून, सकल मूल्य संयोजित असताना उत्पादन सध्याच्या किंमतींवर वार्षिक 8 टक्क्यांनी वाढले होते. त्यानंतर 2004-09 मध्ये सकल मूल्यवर्धित वाढीचा वेग वाढून 20 टक्के झाला. याच किंमतींवर वार्षिक परंतु लक्षणीय म्हणजे रोजगारामध्येही वार्षिक 7.5 टक्क्यांनी वाढ झाली होती. 2009-10 मध्ये कामाच्या सहभागाचे प्रमाण 39.2 टक्के होते. त्यापैकी 53 टक्के शेतीमध्ये होते तर उर्वरित 47 टक्के बिगर कृषी क्षेत्रामध्ये होते. 2000 च्या उत्तरार्धात पहिल्यांदाच कृषी क्षेत्रातील परिपूर्ण कामगार संख्या घटली. एकूण अर्थव्यवस्थेत बेरोजगारीचे दरही 2004-05 मध्ये 8.3 टक्क्यांवरून घसरून 2009-10 मध्ये 6.6 टक्क्यांपर्यंत खाली आले होते. आपण असे म्हणू शकतो की 1991 नंतर भारतीय अर्थव्यवस्थेने चांगली कामगिरी केली पण सध्या भारतीय अर्थव्यवस्था दुसर्या अशांत अवस्थेतून जात आहे. सण 2014 पासून भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर कमी कमी होतो आहे. यात भर म्हणून कोविड19 ने भारतात पाय पसरून विकास दराला खीळ लावली आहे. संबंधित शोध निबंधातून सण 2014 ते 2020 या कालखंडातील भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल कशी आहे, तसेच तीन आर्थिक क्षेत्राचे अध्ययन करून निष्कर्ष काढण्यात येणार आहे.